विराणी ..

ऐकता माझी विराणी का तुझ्या डोळ्यात पाणी
हुंद्का माझ्या गळ्याशी अडखळे शब्दात वाणी ..
मी मला समजावताना शब्द थिजले या मनीं
सूर ओला दूर भासे गात असता प्रेमगाणी ..
आंसूओल्या आर्ततेची दुरूनि येता साद कानीं
गडद अंधारात जावी ती शलाका सांकळोनी ..
झांज वाजे मंदिरी अन कुजबुजे ही सांज कानीं
का दिसाची ओढ वाटे ह्या अशा विझत्या क्षणीं ..
वेचले आयुष्य सारे दु:ख ओले आठवोनि
लोपले अस्तित्व अवघे भारलेल्या त्या क्षणांनी ..
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा