रात पापणीत ..

रात पापणीत आली
जशी उतरली डोळा
तुझ्या हलक्या चाहुली
जीव माझा झाला गोळा ..
पायी वाजता पैंजण
मनी उठतो थरार
काकणांची किणकिण
येई कांटा अंगावर ..
काळॉखाच्या झुल्यावर
चंद्र माझा आंदोळत
मनातल्या फांदीवर
जसा मोर केकावत ..
मनोमनी सुखावतो
स्पर्श कोमल करांचा
अर्थ मनात रहातो
हाय भंगल्या स्वप्नाचा ! ..
........
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा