गुन्हे...

************************
************************
पुन्हा वाटते पुन्हा तू हसावे
गुन्हे नेटके पुन्हा तू करावे
'नको रे...नकोच रे' हाच धोषा
मला हे अमान्य सारे भुलावे
अरे आज मात्र हैदोस झाला
तिने टाकला लिफाफाच नांवे
कशाला उगाच चर्चा सुगंधी
तिला जर हवे फुलांशी दुरावे
इथे ना हवेचा तो बोलबाला
अचंभीत वस्त्या;संन्यस्त गावे
करावा असा परीपाठ आता
कुणाशी न वैर;'मैत्रेय' व्हावे
***********************
***********************
लगागा लगालगा गालगागा ( प्रत्येक ओळीत १८ मात्रा )
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
मार्गदर्शन
हा पहिलाच प्रयत्न आहे गझल लिहायचा.चुका संभवतात त्यावर जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
सस्नेह,
गिरीश कुलकर्णी
सफल
-गिरीश,
तुमचा पहिला प्रयत्न 'तांत्रिक' दृष्टीने सफल आहे. अभिनंदन.
अरे आज मात्र हैदोस झाला
तिने टाकला लिफाफाच नांवे
हे आवडले.
- नचिकेत आठवले