जाणते दु:ख

जाणत्ते दु:ख माझे अन्ती वयात आले
आठवुन भोग सारे अश्रु गळाया लागले.......
कोणीच ना सखी ही मज शोधावयास आली
मज कोठीतुनी नितिचे अर्थ कळाया लागले........
पावित्र्य मन्दिराचे कोठे लयास गेले
भक्तजन मुर्तिची चोरी कराया लागले.......
दुर्जनांना भाव आला ,असत्याचे सत्य झाले
चन्देरी दुनियेतूनी ते खन्डणी गिळाया लागले...
सत्तेच्या हातीच रोटी,दीन येथे का भुकेले
सारेच प्रश्न आता ,मज छाळाया लागले......
सन्दर्भ: जेजुरी येथील मुर्ति चोरी नंतर लिहिलेलि गझल
पुर्व प्रासिद्धी - दिवाळी आंक किल्ले रायगड 2006
प्रा. चन्द्रकान्त जहागीरदार (पुणे)
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा