वृत्त : बरेचसे कन्फ्युजन आहे..जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्शीत आहे !!!

मला रदीफ्-मतला-जमीन वैगरे कनसेप्ट कळलेयत पण वृत्तात जरा कनफ्युजन आहे.
माझ्या आकलनाप्रमाणे दोन प्रकारची वृत्ते असतात...
1)ज्यात ठराविक मात्रा (अन त्याचा पॅटर्न) वापरल्या जातात ते अक्षरवृत्त
2)ज्यात हवे तसे पॅटर्न करुन त्याची जमीन बनवली व तो पॅटर्न पुर्ण कवितेत पाळला की ते मात्रावृत्त होते
-----असा माझा समज आहे आपण प्रकाश टाकावा.
मी मराठी व्याकरणाचा चांगला जाणकार नाही त्यामुळे हे प्रश्न खुप एलीमेंटरी वाटु शकतात् ...
सस्नेह : गिरीश्
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
वृत्त...
गिरीश,
http://www.marathigazal.com/node/665 ह्या दुव्यावर ह्या विषयी चर्चा केली आहे. ती जरूर वाचावी. त्यानंतर काही शंका असेल तर जरूर विचारा.
- नचिकेत आठवले
काही शंका
धन्यवाद नचिकेत.
खुप छान माहीती मिळाली.जोडाक्शरामुळे आघात होत असेल तर त्यापुर्वीचा अक्शर दिर्घ होत हे कळल - मग ज्या जोडाक्शरामुळे ते होतय ते र्हस्व की दिर्घ ??? माझा समज हा की ते र्हस्व होत.. बरोबर की चुक ? तुम्ही दिलेल्या लिंकम्ध्येही वैभव जोशींच्या गझलेत एका ठिकाणी ( मग्न) असेच घेतले आहे पण अन्य एका ठिकाणी दोन्हीही अक्शरे दिर्घ मोजली आहेत म्हणुन जरा गोंधळलोय् :-)
पुन्:श्च धन्यवाद !!!
सस्नेह : गिरीश
जोडाक्षर र्हस्व की दीर्घ हे त्याच्या स्वरावरून ठरते
-
मग्न = गा ल
मक्ता = गा गा
अद्याप = गा गा ल
- नचिकेत आठवले
माहीती
धन्यवाद नचिकेत. आपण अगत्याने दिलेल्या सहकार्याबद्दल!!!
तंत्र बरचस समजलय अन सरावान ते पक्क व्हायला हव.आता जरा मंत्राकडे लक्श देईन म्हणतो.
पुन्:श्च धन्यवाद !
सस्नेह,
गिरीश कुलकर्णी