मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

डॉ.कैलास्'s picture

जीवन कसे जगावे,सगळ्यांस पेच आहे
मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे

पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासतो जे,ते दैवत हेच आहे

वार्धक्य टाळण्याचे,ठाउक ना कुणाला ?
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे

दु:खा पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे.

डॉ.कैलास गायकवाड

Vidyanand Hadke's picture

मजा आ गया

जीवन कसे जगावे,सगळ्यांस पेच आहे
मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे

क्या बात है डॉ साह्ब मजा आ गया
और तो और मक्ता मस्त होता है आपका

दु:खा पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे.

बेफिकीर's picture

रचना

मीटर, शब्दांचे प्रचलीत स्वरूप घेणे, लघु / गुरू व आशय याकडे लक्ष द्यायला हवे असे वाटते. चु. भु. द्या. घ्या.

डॉ.कैलास्'s picture

धन्यवाद

धन्यवाद विद्यानंदजी.....

बेफिकिर.....कहिशी अपरिपक्व रचन आहे असे वाटतेय....पुढची रचना नक्की सुधारेन.

डॉ.कैलास्

farmerk8a's picture

Я пользуюсь

Я пользуюсь поисковой системой yandex.ru, а вы предпочитаете какую?