शिंपडावे तू कधी

निशिकान्त्'s picture

पेटलेल्या भावनाना शातवावे तू कधी
पोर्णिमेच्या चांदण्याला शिंपडावे तू कधी
काय म्हणती लोक याची वाटते भिती तुला
होउनी निर्भिड स्वप्नी वावरावे तू कधी
टोचता पायात काटा नेत्र अश्रू गाळती
जाणुनी मम एकलेपण हळहळावे तू कधी
डोंगरावर ऊंच तू अन पायथ्याला मी उभा
श्रावणाच्या निर्झरासम खळखळावे तू कधी
खूप वर्षे जाहली मी चन्द्र नाही पाहिला
चेह-यावरच्या बटाना आवरावे तू कधी
बेरक्या माझ्या जिवाला ओढ क्षितिजाची असे
आपुल्या जाळ्यात मजला गुंतवावे तू कधी
आत माझ्या पाहता मज दिसतसे अंधार का?
अंतरी नंदादिपाला पाजळावे तू कधी
लागते मजला समाधी गोड गाणे ऍकता
कोकिळा गावी म्हणूनी मोहरावे तू कधी
करपले आयुष्य सारे पान हिरवे ना कुठे
हस्त नक्षत्रा प्रमाणे कोसळावे तू कधी
का असा "निशिकान्त" असतो झिंगलेला तुजमुळे?
तोल त्याचा जात असता सावरावे तू कधी

निशिकान्त देशपान्डे मो. न 98907 99023
E Mail nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा

रुपेन्द्र कदम's picture

निशिकान्त

निशिकान्त सर, आपल्या सगळ्याच गझल मनाला भेदुन जातात.पण या गझलेतील

"का असा "निशिकान्त" असतो झिंगलेला तुजमुळे?
तोल त्याचा जात असता सावरावे तू कधी"

या ओळी खुप आवडल्या.

एक रसिक म्हणून हार्दिक शुभेच्छा...........!