सार

रस्ता ओळखीचा होता,दार ओळखीचे होते!
फक्त ना घरात कुणी,फार ओळखीचे होते!
याचे समाधान होते जातांना तिरडीवरी
लाखांच्या जगात माझे,चार ओळखीचे होते!
खुपसला छातीत तो सुरा अनोळखी होता
पण सुरा मारणारे,यार ओळखीचे होते!
शोषित वंचितांची मी पाहीली दिनदर्शिका
ते सारे दिवस अन् वार ओळखीचे होते!
दिवंगत झाल्यावरी शिव्या देत घातलेले
सत्काराच्या सभेतले,हार ओळखीचे होते!
एक अर्थ शोधण्यात त्यांचा सारा जन्म गेला
शेवटी जे भेटले ते,सार ओळखीचे होते!
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा