गजला घरात माझ्या

निशिकान्त्'s picture

आल्या सरी प्रमाणे गजला घरात माझ्या
पडला उजेड नसता समैईत वात माझ्या
आत्म्यास छेडणा-या तारा समान गजला
त्यानी मला शिकविले बघण्यास आत माझ्या
उद्रेक भावनान्चा होताच त्या क्षणाला
कम्पन बनून गजला आकारतात माझ्या
संवाद काळजाशी करतात शेर जेव्हा
गजलेस कोणतीही नसतेय जात माझ्या
मुजरा सलाम घेणे मजला पसंत नाही
गजलेस भावनांचा द्या कुर्निसात माझ्या
गजलेमुळे मिळाल्या कित्त्येक प्रेमिका मज
शब्दा मधून देती हतात हात माझ्या
निष्प्राण जीव होता होते अचेत जगणे
गजले सवेच आल्या उर्मी उरात माझ्या
का काफिया अलामत लागून ध्यास आहे?
दुसरी घरात आता होते न बात माझ्या
आले उधाण मजला जेव्हा कुणी म्हणाले
"तो करवाच गजला जातोय गात माझ्या"
गजला किती लिहाव्या ठरवेल कोण सांगा?
निश्वास श्वास गजला या जीवनात माझ्या
"निशिकान्त" सांग आता इछा अखेरची तू
अंत:क्षणी फुलू दे गजला मनात माझ्या
निशिकान्त देशपान्डे मो.न. 98907 99023
E mail nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा

Vidyanand Hadke's picture

या गझला अशाच सतत बहरत राहो....

"निशिकान्त" सांग आता इछा अखेरची तू
अंत:क्षणी फुलू दे गजला मनात माझ्या

मक्ता गझलेची आसक्ती सांगून गेला निशिकांतजी, वाह!!! या गझला अशाच सतत बहरत राहो.

निशिकान्त्'s picture

आपला प्रतिसाद्

आअपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद. आपण फोन करून सांगितलेली चूक पण दुरुस्त केली आहे. "आहेत" ऍवजी
"समान" हा शब्द टाकला आहे. तळमळीने अपलीच मणसे सुचना देतात. या वेब साइट मुळे आपल्या सारख्याशी संपर्क आला याचा आनंद आहे.