गझल
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या गझलांची यादी... आपण आपली स्वतःची गझल या विभागात प्रकाशित कराच या शिवाय प्रकाशित गझलांचे रसग्रहण अथवा त्यावर चर्चा देखील प्रतिसादांच्या रूपाने करू शकाल

जगा !
जगा मी तुला कां पटू लागलेला ?
तुझ्यासारखा की दिसू लागलेला ?
तुला पाहताना झुला व्हायचो मी
जुना झोल आता सरू लागलेला
तुझा डंख माझ्या इमानास झाला
उभ्या रोमरोमी भिनू लागलेला
असे मिसळूनी एकमेकात गेलो

काजवे
काजवे धुंदीत कोण्या मग्न होते
सूर्य माझा जाळण्याचे स्वप्न होते
माणसे साधीच होती भोवताली
माणसांना जाळणारे यज्ञ होते
गाव होते साव आणिक सज्जनाचे
आपल्या घरटयात सारे नग्न होते
लोक भगवे, श्वेत, हिरवे अनं निळेही

माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले...
पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले
माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले
पावसाळी हि तरुंना येईना फुटवा परंतु
जंगलातील बंगल्यांचे वृक्ष डेरेदार झाले
प्राण जाईतो कुणाला लागला नाहीच पत्ता

नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते
ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते
बाग जरा नाखुशच होती फुलांनीच समजोता केला
नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते
पाय मोकळे झाल्यावरती उभा राहिला नवाच गुंता

हा सोहळा कुणाचा? [प्रश्नगझल]
जत्रेत काफिरांच्या गोतावळा कुणाचा ?
ही पालखी कुणाची हा सोहळा कुणाचा?
साधून डाव गेले ते पाहुणे कुणाचे?
गर्दीत आवळ्यांच्या तो कोहळा कुणचा?
कैफात आरत्यांच्या हा जोगवा कुणाचा?
तांड्यात मोगलांच्या तो मावळा कुणाचा?

अर्थ मौनाचे...
अर्थ मौनाचे... ( गझल )
लोक सारे व्यर्थ जेव्हा, बडबडाया लागले...
अर्थ मौनाचे तुझ्या, मज आकळाया लागले...
तू अशी जादूगरी, केली सखे माझ्यावरी...
सावली अन् देह आता, एक व्हाया लागले...
पौर्णिमेच्या चांदण्याने घाव केले पाशवी...

शेर
परवानगी मला दे । पाणी पिण्यास आता।।
सार असते जगाया । संजीवनीच आता ।।
----------------------
तो चेहरा सुखाचा खुलवी मला सुखाने
हुलकावणी सदा का दाखवावी मला सुखाने
------------------------------------
ती सुळावर धाडसाने माणसे जातात कशी

दूरावा एक कविता !
मी एकटा असतानाही
मला एकटेपणा जाणवत नाही
कारण तूझ्या आठवणीत
मला वेळेचे भाणच रहात नाही
रंगवून रंगवून किती स्वप्ने रंगवीणार मी
एक दिवस तर तू सोडून जाणार
मी रंगविलेली सारीच स्वप्ने
आरशासारखी तूटून जाणार

दिसेनाशी झाली
काळ्या ठिक्कर ग अन्धारात
कशी चालली ठूमकत रात
घालुनी अन्गावार शालु काळा
सन्गे आहे चान्दन्याचा मेळा
चान्दन्या मधे किटके गातात गाण
त्या गान्याने होते तीचे मनोरन्जन्
रात आहे दिसन्यास काळी
सकाळी पाहातो ती दिसेनाशी झाली

कदाचित
सरेल एवढा प्रहर कदाचित
तुला पडेलही विसर कदाचित
पुन्हा कधीतरी समीप येता
तुझी वळेलही नजर कदाचित
समोरुनी तुझ्या निघून गेलो...
(तुला नसेल ही खबर कदाचित! )
करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित
अजून मी बजावतो मनाला-