गझल

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या गझलांची यादी... आपण आपली स्वतःची गझल या विभागात प्रकाशित कराच या शिवाय प्रकाशित गझलांचे रसग्रहण अथवा त्यावर चर्चा देखील प्रतिसादांच्या रूपाने करू शकाल

प्रभाकर काम्बले987's picture

कळेना

पाखराना पोसणारा कोण आहे ते कळेना
तापलेल्या या धरेला नाहतो कोणी कळेना.

मेघमालेच्या या रथाला ओढतो कोणी कळेना
चांदण्यांची रंगावली घालतो कोणी कळेना.

माणसांच्या या जथ्यातिल कोण कैसा ते कळेना

प्रभाकर काम्बले987's picture

छोटा

आयुष्याच्या वाटेवर मी असा एकला आहे
तिरडीवरती मीच आणखी, मी खांदेकरी आहे.

कशास पुसता कूशल माझे, मी हे जाणुन आहे
बाजारी या आला कुणि जो, तो सौदागर आहे.

शोडष उपचारानी ज्यानी पूजन केले आहे

प्रभाकर काम्बले987's picture

सृष्टीरंग

आहेत ईश्वरी रे हे सृष्टीरंग बघ तू
सार्‍या कलाकृतीना समरसुन दाद दे तू.

करतोस का विचार सार्‍याच या जगाचा
एका तरी स्व्तःला बदलून दाव रे तू.

गर्दीत चालताना धक्का कुणा न लागो
इतका विवेक पुरता मागून घे तया तू.

निशिकान्त्'s picture

रुतबा तुझ्या रुपाला

रुतबा तुझ्या रुपाला दिसतो खुलून आहे
गझला कुणी तुझ्यावर बसला लिहून आहे
सौन्दर्य आज खुलले खिळल्या अनेक नजरा
आदब सलाम तुजला करतो लवून आहे
रेखून चित्र झाले भरण्यास रन्ग आता
केशर गुलाब दोन्ही घेतो खलून आहे

ar_diamonds's picture

ऋतू येत होते ऋतू जात होते...

(मी गझल कार्यशाळेला नव्हतो. तरी एक प्रयत्न....अभ्यास म्हणून....)

ऋतू येत होते ऋतू जात होते
तुझे गीत माझ्या श्वासात होते

न्याहाळीत होते जरी मीच मजला
प्रतिबिंब तुझे परि आरशात होते

धुंद चांदव्यात फुलला देह सारा

ar_diamonds's picture

का...?

झाली तपश्चर्या वेदनांची,का मनी आकांत नाही
राख झाल्या चिता सयींच्या,का स्मशान शांत नाही

तप्त चांदवा मनात,का चांदण्यांची वरात नाही
साथ सुरेख मॅफिलीला,का आर्तता स्वरांत नाही

धुके पसरले जीवनी,का ओल त्या दवात नाही

संजय इंगळे तिगावकर's picture

सांग मित्रा...

गाव होते शांत आता काय झाले, सांग मित्रा
दंगलीची क्रूर भाषा कोण व्याले, सांग मित्रा

सावली होण्या जगाची सोसला ज्यांनी उन्हाळा
सोबती त्यांच्या चितेवर कोण आले, सांग मित्रा

माणसाने आणली ही अंगणी आकाशगंगा

संजय इंगळे तिगावकर's picture

तू न यावे असे...

तू न यावे असे रोज भेटायला
गाव हे लागले आज बोलायला

कालच्या वेदना संपल्या ना जरी
का पुन्हा दु:ख आलेच भांडायला

सूर माझ्या गळ्याला छळू लागला
ऊर लागे हवेचाच दाटायला

प्राण कंठातुनी ना जरी त्यागला
लोक गोळा कसे लागले व्हायला

संजय इंगळे तिगावकर's picture

खरे तेच ...

जरा थांब तू ऐक माझा खुलासा
अता पापण्यांना पुरे हा दिलासा

गुन्हा हाच होता तुला भेटलो मी
गुन्हेगार हा श्वास माझा जरासा

तुला गुणगुणाया जिथे गीत नाही
असा सूर वाटे मलाही नकोसा

पुन्हा राख झालोच तेजाळताना

उपरा's picture

बात नाही !

बिंब माझ्या अनुभवांचे ज्यात नाही
ते फुलांचे गीत खोटे गात नाही

आज गाभार्‍यात कां काळोख दाटे ?
वाचली कां एकही फुलवात नाही ?

जन्म अख्खा कोरला त्याने कपाळी
भोगल्या वाचून कोणी जात नाही

जीवना ठाकेन मी पुन्हा लढाया