गझल

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या गझलांची यादी... आपण आपली स्वतःची गझल या विभागात प्रकाशित कराच या शिवाय प्रकाशित गझलांचे रसग्रहण अथवा त्यावर चर्चा देखील प्रतिसादांच्या रूपाने करू शकाल

निशिकान्त्'s picture

शिंपडावे तू कधी

पेटलेल्या भावनाना शातवावे तू कधी
पोर्णिमेच्या चांदण्याला शिंपडावे तू कधी
काय म्हणती लोक याची वाटते भिती तुला
होउनी निर्भिड स्वप्नी वावरावे तू कधी
टोचता पायात काटा नेत्र अश्रू गाळती
जाणुनी मम एकलेपण हळहळावे तू कधी

सचिन म्हैसकर's picture

एकरुप

कागदे माझी वाच जराशी!
लपेटून घेशील उराशी!

चमचमता बंगला दिसे
पण मी प्रामाणिक घराशी!

शाप तुझे ते मनापासुनी
तुलना त्यांची दैवी वराशी!

जेथे जुळती मने मनाला
कर जुळती तेथे कराशी!

घेती भरारी गगनावरी
अंती पाखरे येती धराशी!

निशिकान्त्'s picture

बस एक श्वास आहे

हे, ते जगात माझे सारा अभास आहे
सा-या जगात माझा बस एक श्वास आहे
आहे तरी कुणाचा? माझे मला कळेना
अपुल्यात आज दिसतो रेशीम फास आहे
मी गारवा सुखाचा जगलो पसा भरूनी
बाकी गरम उन्हाळा साथीस प्यास आहे
भगवे बघून कपडे करता सलाम कळले

सचिन म्हैसकर's picture

सार

रस्ता ओळखीचा होता,दार ओळखीचे होते!
फक्त ना घरात कुणी,फार ओळखीचे होते!

याचे समाधान होते जातांना तिरडीवरी
लाखांच्या जगात माझे,चार ओळखीचे होते!

खुपसला छातीत तो सुरा अनोळखी होता
पण सुरा मारणारे,यार ओळखीचे होते!

सचिन म्हैसकर's picture

तू हे बरे केले!

तू हे बरे केले!
तुझे खरे केले!

भिंत होती छोटी
मोठे चरे केले!

तुझी त्रुशा मोठी
डोळे झरे केले!

कंटाळुन दु:ख
मी साजरे केले!

फाशीच्या दोरांचे
तू गजरे केले!

निशिकान्त्'s picture

गजला घरात माझ्या

आल्या सरी प्रमाणे गजला घरात माझ्या
पडला उजेड नसता समैईत वात माझ्या
आत्म्यास छेडणा-या तारा समान गजला
त्यानी मला शिकविले बघण्यास आत माझ्या
उद्रेक भावनान्चा होताच त्या क्षणाला
कम्पन बनून गजला आकारतात माझ्या

निशिकान्त्'s picture

चेहरे मी पाहिले

बेगडी अन चमकणारे चेहरे मी पहिले
चेह-याना झाकणारे चेहरे मी पहिले
कळवळा गाळातल्यान्चा राज्यकर्ते दावती
आरशाला फसवणारे चेहरे मी पाहिले
भाग्य मन्त्र्यान्चे तयाना पक्ष श्रेष्ठी पावली
जी हुजूरी वाकणारे चेहरे मी पाहिले

अनि's picture

मुक्तके

हळुवार पैंजणांचा भलताच वार झाला....
त्याच्यात जीव माझा बेहोश पार झाला...
लाजून झाकले बघ डोळे ग चांदण्यांनी,,
एकेक चांद वेडा तेथेच ठार झाला...

रात्री अशा प्यासा मला सोडून ती गेली कुठे??
चंद्रास त्या सोडून तेवा चांदणी गेली कुठे??

निशिकान्त्'s picture

हीच का ती माणसे?

राम भजनी रन्गणारी हीच का ती माणसे?
एकतारी छेडणारी हीच का ती मणसे?
साद देण्या द्रौपदीला आजना उरला कुणी
क्रष्ण महिमा वाचणारी हीच का ती माणसे?
जाळती नवरीस नवख्या स्त्री-भ्रुणाला मारती
स्त्रीस देवी मानणारी हीच का ती माणसे?

निशिकान्त्'s picture

रचल्या तुझ्याच साठी

ह्रदयी अनेक लाटा उठल्या तुझ्याच साठी
गजला अनेक सखये रचल्या तुझ्याच साठी
चाहूल लागता तव दरी वसन्त फुलतो
केसातल्या कळ्याही फुलल्या तुझ्याच साठी
आनन्द दावण्याची अपुलीच रीत असते
वेली लता खुशीने झुलल्या तिझ्याच साठी